स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज

स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज

1. स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘आयएनएस करंज’चे ३१ जानेवारी रोजी मुंबईच्या माझगाव डॉक येथून जलावतरण करण्यात आले.
2. ‘प्रकल्प ७५’ अंतर्गत स्कॉर्पियन वर्गातील ६ पाणबुड्यांच्या निर्मितीचे काम माझगाव गोदी येथे सुरू आहे. या ६ पाणबुड्या २०२०पर्यंत नौदलात सामील करण्याचे उद्दीष्ट आहे.
3. यापूर्वी याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस कलवरी आणि खांदेरी या पाणबुड्यांचे जलावतरण पार पडले होते.
4. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या आयएनएस करंजमुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे.
5. नौदलाचे चीफ अॅडमिरल : सुनील लांबा
करंज पाणबुडीची वैशिष्ट्ये
1. फ्रान्सच्या मदतीने ‘मेक इंन इंडिया’अंतर्गत तयार करण्यात आलेली करंज ही पूर्णपेण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे.
2. या पाणबुडीची लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर आहे. तिचे वजन १५६५ टनआहे.
3. टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.
4. युद्धाच्या वेळी अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते. ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही.
5. या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो.
6. शत्रूला नेमके शोधून लक्ष्य करणे आणि पाण्यात राहून छुप्या पद्धतीने माहिती गोळा करण्याची क्षमताही या पाणबुडीत आहे.
7. जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहता यावे यासाठी पाणबुडीत ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती