Posts

Showing posts from May, 2017

जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका

जहालवादाचा विकास आणि (लोकमान्य टिळकांची) भूमिका १८९२ पासून इंग्रजांच्या न्यायी व उदारमतवादी धोरणाबाबत साशंकता निर्माण झाली. र्लॉड कर्झनची राजवट, बंगालची फाळणी आणि स्वदेशी बहिष्कार चळवळ यातून जहालवादाचा उदय झाला. जहालवादी विचार म्हणजे सरकारशी सहकार्याऐवजी संघर्ष प्रार्थऐवजी प्रतिकार, या मार्गाने सरकारवर पडपण आणणे. लाल, बाल, पाल यांनी नेतृत्व करून सभा चर्चा वृतपत्रे व्याख्याने इ. साधनांद्वारे जहाल विचाराचा प्रसार केला. जहालजवादाच्या उदयाची कारणे आणि कार्यक्रम १) सरकारचे अन्यायकारक धोरण इंग्रजांचा आर्थिक साम्राज्यवादातून राजकीय साम्राज्याचा उदय झाला भारतातून व्यापार, कर, पगार, माध्यामातून प्रचंड संपज्ञ्ल्त्;ाी मायदेशी पाठवली. २) शेतकर्यांची पिळवणूक भारतातील जनता शेतीवर अवलंबून होती. नैसर्गिक संकटे, टोळधाडी यामूळे उत्पन्न मिळत नसे तरीपण सरकारला कर द्यावा लागत असे सावकार व सरकारकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याने उपाशीपोटी जीवन जगावे लागे. ३) नैसर्गिक संकटसंदर्भात जुलमी धोरण १८९६-९७ व १९०० या काळात दुष्काळ पडून दोन कोटी लोकांना तडाख बसला तरीही सरकारने उपाययोजना केली नाही. महाराष्ट्र्रा

सामाजिक सुधारविषयक कायदे

सामाजिक सुधारविषयक कायदे सतीबंदी (१८२९) सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे. ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते . नंतर पुराण ग्रंथात सती प्रिथेला महत्व प्राप्त झाले. पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई. काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई. ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत. ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती. काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस,

राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचा उदय व विकास

राष्ट्रीयत्वाच्या जाणिवेचा उदय व विकास प्राचीन काळापासून भारतातील उद्योगधंदे अतिशय भरभराटीस आले होते. भारतीय मालास सर्वत्र फार मोठी मागणी होती. भारतीय तलम व स्वस्त कापडास संपूर्ण जगातून मागणी होती त्यामुळे भारत हा आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होता. पण व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या ईस्ट इंडिया कंपनीने व्यापार शिक्षण धर्मप्रसार व साम्राज्यविस्तार या पायर्यांनी भारतातील बहूतांश भागावर आपली सत्ता हळूहळू प्रस्थापित केली. इंग्लडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि भारतातील परिस्थिती बदलू लागली ब्रिटिशांच्या स्वार्थी धोरणामुळे भारतीय पक्क्या मालाचा खप कमी होत जाऊन ब्रिटिशांच्या मालाचा खप अधिक होऊ लागला. भारतीय कच्चा माल इंंग्लंमध्ये जाऊ लागला व इंग्लंडमधून पक्का माल भारतात येऊ लागला त्यामुळे भारतातील पैशांचा ओघ इंग्लंकडे वाहू लागला भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या व नैसर्गिकदृष्टया समृध्द अशा देशावर इंग्रजानी जी राजकीय सत्ता स्थापन केली त्याचा हा परिणाम होय. भारतीय शेतकरी दिवसेदिवस अधिक दरिद्री होऊ लागले भारतीयांचे विविध मार्गानी शोषण होऊ लागले. त्यामूळे शेतकरी व इतर जनता यांच्यातील असंतो