अमरावती प्रशासकीय विभागा विषयी संपूर्ण माहिती

अमरावती प्रशासकीय विभागा विषयी संपूर्ण माहिती

1. अमरावती जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अमरावती

1. क्षेत्रफळ - 12,210 चौ.कि.मी.

2. लोकसंख्या - 28,87,826 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

3. तालुके - 14 - अचलपूर, मोर्शी, दर्यापूर, अमरावती, चांदुरबाजार, भातकुली, अंजनगांव (सुर्जी), नांदगांव (खं.), चिखलदरा, धारणी, वरुड, तिवसा, चांदूर रेल्वे, धामनगांव रेल्वे.

4. सीमा - अमरावती जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस यवतमाळ जिल्हा असून पूर्वेस नागपूर व वर्धा हे दोन जिल्हे आहेत. पश्चिम व नैऋत्येस अकोला जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

1. अमरावती येथे पूर्वी उंबराची झाडे मोठ्या प्रमाणात होती. उंबराच्या या झाडांवरून उंदुबरावती असे झाले व कालांतराने उमरावतीचे अमरावती असा अपभ्रंश होत जावून आजचे अमरावती हे नाव उदयास आले.

2. अमरावती जिल्हयातल कौंडन्यपूर हे गाव रुख्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध. डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांची कर्मभूमी. डॉ. पंजाबराव देशमुख, विर वामनराव जोशी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगे बाबा अशा थोर पुरुषांची जन्मभूमी.

3. अमरावती विधापिठाचे नामकरण 'संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ' असे करण्यात आले.

प्रमुख स्थळे

1. अमरावती - येथील संत गाडगे महाराजांनी समाधी व अंबादेवी मंदीर प्रसिद्ध आहे. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे मुख्यालय येथे आहे.

2. चिखलदरा - थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले हे स्थळ विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाते.

3. परतवाडा - इमारती लाकडाच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.

4. रिद्धपूर - येथे गोविंद्प्रभुंची समाधी आहे. महानुभावांची काशी म्हणून प्रसिद्ध.

5. शेडगाव - संत गाडगे महाराजांचे जन्मगाव म्हणून प्रसिद्ध आहे.

6. मोझरी - संत तुकडोजी महाराजांनी स्थापना केलेला गुरुकुंज आश्रम येथे आहे. महाराजांची समाधी येथेच आहे.

7. ऋणमोचन - येथील मुदगलेश्वराचे मंदीर प्रसिद्ध आहे.

8. बडनेरा - विड्याच्या पानासाठी बडनेरा परिसर प्रसिद्ध आहे.

9. कौंडिण्यपुर - विदर्भाची पौराणिक राजधानी कुंडीनपूर या नावाने महाभारतात प्रसिद्ध असलेले आता कौंडिण्यपुर म्हणून ओळखले जाते. प्राचीन अवशेषांकरिता विशेष प्रसिद्ध आहे.

10. सालबर्डी - हे गाव मोर्शी तालुक्यात असून मारू नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाजवळच 2 बौद्ध व 5 हिंदू लेणी आहेत. शिवाय नुकत्याच काळात पाशुपत पंथाच्या 2 लेण्यांचा शोध लागलाय. तसेच लंकेश्वर व पंचवतार मंदिरे, डोंगरावरील शिव मंदीर प्रसिद्ध आहे.

11. कुंडीनपूरचा राजा भीष्मकाची कन्या रुक्मिणी ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.

12. वर्धा नदीच्या काठावर कौंडण्यपुर येथे विठ्ठल-रुक्मिणी चे मंदीर विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे मोठी यात्रा भरल्या जाते. ही भगवान श्रीकृष्णाची पत्नी असल्याचा उल्लेख महाभारतात सापडतो.

13. मर्यादापुरषोत्तम रामाचे आजी अजोबा नल, दमयंतीपैकी नल यांची कौंडण्यपुर ही जन्म नगरी असल्याचा उल्लेख आढळतो.

14. अमरावती जिल्ह्यातून वाहणार्‍या नद्या - तापी, पूर्णा, वर्धा, पेढी, चंद्रभागा, विदर्भा, गाडगा, सिपना, शहाणूर

15. अमरावती जिल्ह्यामध्ये औधोगिक वसाहती - अमरावती, अंजनगाव, दर्यापूर, अचलपूर, मोर्शी, वरुड.

16. ढाकणे-कोलखाज वन्यप्राणी अभयारण्य अमरावती जिल्ह्यात आहे.

17. अमरावती विधापिठाचे नाव-संत गाडगे बाबा अमरावती विधापीठ.

18. अमरावती जिल्ह्यामध्ये कृषी उत्पादनाच्या प्रमुख बाजारपेठा- अमरावती, चांदूर, दार्यापूर, अचलपूर, धामनगांव, वरुड.

19. अमरावती जिल्ह्यामध्ये प्रमुख औधोगिक उत्पादने - तेल गाळणे, हस्तकला, यंत्रमाग, कापड, हातमाग.

20. अमरावती जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता - घुळे-कलकत्ता (6)

21. अमरावती जिल्ह्यातील आदिवासी जमाती - कोरकू व गोंड

22. अमरावत जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण - चिखलदरा

2. अकोला जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - अकोला

1. क्षेत्रफळ - 5,429 चौ.कि.मी.

2. लोकसंख्या - 18,18,617 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

3. तालुके - 7 - अकोट, बाळापूर, तेल्हारा, अकोला, मूर्तीजापूर, पातुर, बार्शी टाकळी.

4. सीमा - उत्तरेस व पूर्वेस अमरावती जिल्हा, दक्षिणेस वाशिम जिल्हा असून पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

1.अकोला हे शहर अकोलसिंग नावांच्या रजपूत सरदाराने वसविले असल्याचे सांगितले जाते. या शहराचा 'आईन-ए-अकबरी' यामध्ये नरनाळ्याच्या सुभ्याचा अकोला हा एक परगणा असल्याचा उल्लेख आढळतो. कापसाचे आगार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो.

2.22 किमी. क्षेत्रावर पसरलेला, 67 बुरूज व 27 दरवाजे असलेला किल्ला इतिहास प्रसिद्ध असू गाविलगडच्या पर्वतरांगेत वसला आहे.

प्रमुख स्थळे

1. अकोला - मोरणा नदीमुळे या शहराचे जुने व नवे असे दोन भाग पडलेले आहे. पंजाबराव कृषी विधापीठाचे मुख्य ठिकाण, सतीमाता मंदीर व जैन मंदीर व जैन मंदीर प्रसिद्ध आहे.

2. बाळापूर - बालापूरचा किल्ला 1757 मध्ये इस्माईल खानाने पूर्ण केला या किल्ल्याच्या खाली बळादेवीचे मंदीर आहे.

3. नरनाळा - येथील 22 दरवाज्यांचा किल्ला पर्यटकांचे आकर्षण आहे. 1509 मध्ये महाबत खानाने बाधलेली मस्जिद आहे.

4. मूर्तीजापूर - येथे संत गाडगे महाराजांचा आश्रम आहे.

5. पातुर - हे साग व चंदनी लाकडासाठी प्रसिद्ध आहे.

6. पारस - औष्णिक वीज निर्मिती केंद्र.

7. अकोट - सतरंज्या व गोणी प्रसिद्ध.

8. आडगाव - ता. अकोट, मुगल काळातील परगण्याचे हे केंद्र. याच गावात 1671 साली व्दारकेश्वराचे मंदीर बाधण्यात आले. गावाजवळच इंग्रज अधिकारी मेजर बुलक याचे थडगे आहे.

9. हिवरखेड - आंब्यासाठी प्रसिद्ध आहे.

10. मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यात सातपुड्याच्या पर्वत रांगेतून उगम असलेली पूर्णा नदी ही अकोल्या जिल्ह्याची प्रमुख नदी होय.

11. अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती 1 जुलै 1998 रोजी करण्यात आली.

12. अकोला जिल्ह्यातून गेलेले राष्ट्रीय हमरस्ते - धुळे-कोलकत्ता (6)

13. अकोला जिल्ह्यात शिवाजी शिक्षण संस्थेच्या जास्त शाळा आहेत.

3. बुलढाणा जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - बुलढाणा

1. क्षेत्रफळ - 9,661 चौ. कि.मी.

2. लोकसंख्या - 25,88,039 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

3. तालुके - 13 - जळगांव जामोद, मलकापुर, बुलढाणा, खामगांव, नांदुरा, चिखली, मेहकर, शेगाव, देऊळगांवराजा, सिंदखेडराजा, संग्रामपुर, लोणार, मोताळा.

4. सीमा - बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेस मध्य प्रदेश, दक्षिणेस परभणी व जालना हे दोन जिल्हे असून पूर्वेस अकोला जिल्हा आहे. पश्चिमेस औरंगाबाद व जळगाव हे दोन जिल्हे आहेत.

जिल्हा विशेष -

1. प्राचीन 'कुंतल' देशात हा प्रदेश समाविष्ट होता. सम्राट अशोकाच्या साम्राज्याच्या हा प्रदेश एक भाग होता. भिल्लांचे वस्तीस्थान म्हणजे 'भिल्लठाणा' या शब्दाचा अपभ्रंश होऊन बुलढाणा हे नाव रूढ झाले.

2. जिल्ह्याचे मुख्यालय असलेले बुलढाणा हे शहर वनश्रीने नटलेले व निसर्गरम्य स्थळ आहे. या शहराला विदर्भाचे प्रवेशव्दार म्हणून ओळखले जाते.

3. हजारो वर्षापूर्वी उल्का पडल्यामुळे या जिल्ह्यात लोणार हे ठिकाण खार्‍या पाण्याच्या सरोवरासाठी जगभर प्रसिद्ध आहे.

प्रमुख स्थळे

1. बुलढाणा - हे शहर अजिंठ्याच्या डोंगर रांगात वसले असून थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे.

2. खामगाव - येथे एक कुष्ठरोग निवारण केंद्र आहे. जवळच गारडगावाला प्रेक्षणीय बुद्ध विहार आहे.

3. मलकापुर - येथील गौरीशंकर मंदिर विहार आहे.

4. देऊळगाव राजा - देऊळगाव -राजा येथील बालाजी मंदीर प्रसिद्ध आहे.

5. शेगांव - येथे गजानन महाराजांची समाधी आहे.

6. सिंदखेड-राजा - छत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री जिजाई यांचे जन्मस्थान

7. जामोद - जामोदचे प्राचीन जैन मंदीर प्रसिद्ध आहे.

8. लोणार - उल्कापातामुळे तयार झालेला तलाव व त्या शेजारी यादवकालीन मंदीर प्रसिद्ध आहे. 18 व्या शतकात लोणार महात्म्यही लिहिले गेले त्यात लवणासुर या राक्षसाची कथा या महात्म्यात येते.

9.राणीबाग वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.

10. लोणार क्रेटर वनोधान बुलढाणा जिल्ह्यात आहे.

11. बुलढाणा जिल्ह्यातून पेनगंगा, पूर्णा, पांडव, नळगंगा, बेंबळा, बाणगंगा, केदार, ज्ञानगंगा या नद्या वाहतात.

13. बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख औधोगिक उत्पादने कापड, यंत्रमाग, भांडी, तेल काढणे, साखर, हत्यारे ही आहेत.

14. बुलढाणा जिल्ह्यात नळगंगा नदीवर नळगंगा धरण आहे.

15. बुलढाणा जिल्ह्यातून गेलेल्या लोहमार्गाची एकूण लांबी मुंबई-भुसावळ-हावडा (ब्रोंडगेज), जलंब-खामगांव (ब्रोंडगेज), 46 कि.मी.

4. वाशिम जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - वाशिम

1. क्षेत्रफळ - 5,153 चौ.कि.मी.

2. लोकसंख्या - 11,96,714 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

3. तालुके - 6 - वाशिम, मलेगांव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा.

4. सीमा - उत्तरेस अकोला व अमरावती, दक्षिणेस यवतमाळ व हिंगोली जिल्हे असून पूर्वेस यवतमाळ आणि पश्चिमेस बुलढाणा जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

1. 1 जुलै 1998 रोजी अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम जिल्हा निर्माण करण्यात आला.

2. वाशिमला पुरातन इतिहास आहे. वाशिमचे पुरातन नाव वत्सगुल्म होते. वत्स ऋषीच्या नावावरून हे नाव आले असावे. काही अवशेशावरून वाकाटक साम्राज्याचा संदर्भही वाशिम सोबत जोडला आहे.

3. या जिल्ह्याचा बराचसा भाग डोंगराळ व पठारी आहे. पैनगंगा ही या जिल्ह्याची प्रमुख नदी असून दक्षिण भाग सखल प्रदेशाचा आहे.

4. या जिल्ह्यामध्ये आंध, गोंड आणि बंजारा या आदिवासी जमाती येथे प्रामुख्याने आढळतात.

प्रमुख स्थळे

1. वाशिम - येथील पद्मावती तलाव, मधेश्वर मंदिर आणि बालाजी मंदिर प्रसिद्ध आहे.

2. कारंजा - नृसिंह सरस्वतीचे जन्मस्थान. येथील जैन मंदिर प्रेक्षणिय आहे.

3. तर्हाळा - हे पठाण लोकांचे पवित्र स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

4. रिसोड - अमरदासबाबांचे मंदिर आहे.

5. यवतमाळ जिल्हा

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण - यवतमाळ

1. क्षेत्रफळ - 13,582 चौ.कि.मी.

2. लोकसंख्या - 27,75,457 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

3. तालुके - 16 - दारव्हा, यवतमाळ, पुसद, राळेगांव, वणी, बाभुळगांव, कळंब, मारेगांव, पांढरकवडा, घाटंजी, दिग्रस, नेर, उमरखेड, महागांव, आर्णी, झरिजामाणी.

4. सीमा - उत्तरेस वर्धा व अमरावती जिल्हा, दक्षिणेस नांदेड जिल्हा व आंध्र प्रदेश आहे. पूर्वेस चंद्रपूर जिल्हा आणि पश्चिमेस परभणी व अकोला जिल्हा आहे.

जिल्हा विशेष -

1. यवतमाळ शहराचे नाव पूर्वी यवत किंवा यवते असे असावे. यवते चा महाल असा प्रत्यय लागून यवतमाळ हे नाव पडले असावे.

2. महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी अग्रेसर असल्यामुळे 'पांढरे सोने पिकविणारा किंवा कापसाचा जिल्हा' म्हणून ओळखला जातो.

3. वर्धा व पैनगंगा या दोन नधा जिल्ह्याच्या प्रमुख नधा होत.

प्रमुख स्थळे

1. यवतमाळ - प्राचीन भारताच्या इतिहासाचे संशोधन करणारी शारदाश्रम ही संस्था येथे आहे. येथील केदारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.

2. वणी - येथील रंगनाथस्वामींचे मंदिर प्रसिद्ध आहे.

3. पाटणबोरी - हे ठिकाण पांढरकवडा तालुक्यात असून दगडापासून फरशी बनविण्याचा उधोग येथे आहे.

4. घाटंजी - मोरोली महाराजांच्या यात्रेकरिता प्रसिद्ध.

5. कळंब - कलंबचा श्री चिंतामणी विदर्भातील भाविकांचे महत्वाचे श्रद्धास्थान आहे. भारतातील 21 महत्वाच्या आणि पौराणिक आधार असलेल्या गणेश स्थानांमध्ये श्री चिंतामणीचा समावेश होतो.

6. पोहरा देवीचे जगदंबा मंदिर बंजारा समाजाची काशी म्हणून उल्लेख होतो.

7. जैनांची काशी म्हणून ओळखले जाणारे शिरपूर जैन हे पुरातन गांव जैन धर्मीयांच्या तीर्थक्षेत्राबरोबरच प्रेक्षणीय पर्यटन स्थळ आहे.

8. किनवट अभयारण्य यवतमाळ जिल्ह्यात आहे.

9. टेपेश्वर राखीव मृगया क्षेत्र यवतमाळ जिल्ह्यात आहे.

10. यवतमाळ जिल्हयातून पैनगंगा नदी वाहते.

11. यवतमाळ जिल्ह्यातून गेलेला राष्ट्रीय हमरस्ता - हैद्राबाद- जबलपुर (क्र.7)

12. विदर्भामध्ये नागपुर व अमरावती ही दोन प्रशासकीय विभाग येते.

13. नागपुर प्रशासकीय विभागात 6 जिल्हे व अमरावती प्रशासकीय विभागात 5 जिल्हे अशी एकूण 11 जिल्हे विदर्भात आहे.

14. विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा - गडचिरोली. (क्षेत्रफळ - 14,412 चौ.कि.मी.)

15. विदर्भात क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा - भंडारा. (क्षेत्रफळ - 3,895 चौ.कि.मी.)

16. विदर्भातील लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा - नागपूर.

17. सहकारी तत्वावर विदर्भातील पहिला साखर कारखाना - जिजामाता सहकारी साखर कारखाना मर्यादित हा होय.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती