लोकसभा अध्यक्ष

17. लोकसभा अध्यक्ष

* अध्यक्षांची प्रशासकीय भूमिका

०१. अध्यक्ष लोकसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून कार्य करतात. सचिवालय त्यांच्या अंतिम नियंत्रण व निर्देशाखाली कार्य करते. संसद सभागृहातील सर्व अनोळखी व्यक्ती, आगंतुक व पत्रकार हे अध्याक्षांच्या शिस्त व आदेशाच्या अधीन असतात.

०२. अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहात कोणतेही नवीन बांधकाम किंवा त्यात बदल करता येत नाही. अध्यक्षांच्या परवानगीशिवाय संसदेच्या परिसरातील कोणत्याच व्यक्तीला (मंत्री ते सेवक) अटक करता येत नाही.

०३. लोकसभा सदस्याला गुन्ह्याच्या आरोपाखाली अटक झाली किंवा शिक्षा झाली किंवा कार्यकारी आदेशाखाली त्याला कोठडीत ठेवण्यात आले तर दंडाधिकाऱ्याने किंवा कार्यकारी अधिकाऱ्याने हि गोष्ट अध्यक्षांना त्वरित कळवली पाहिजे. तसेच त्याची सुटका झाल्यावरही कळवणे आवश्यक आहे.

* अध्यक्ष आणि आंतरसंसदीय संबंध

०१. लोकसभेचे अध्यक्ष १९४९ मध्ये स्थापन झालेल्या 'भारतीय संसदीय गटा'चे पदसिद्ध अध्यक्ष असतात. भारतात हा गट 'कॉमनवेल्थ पार्लमेंटरी संघा'ची शाखा म्हणून आणि 'आंतर संसदीय संघा'चा भारतातील राष्ट्रीय गट म्हणून कार्य करतो.

०२. त्यानुसार अध्यक्ष परदेशात जाणाऱ्या विविध भारतीय संसदीय शिष्टमंडळाच्या सदस्यांचे राज्यसभेच्या सभापतींशी चर्चा करून नामनिर्देशन करतात. बराचवेळा अध्यक्ष स्वतःच शिष्टमंडळाचे नेतृत्व करतात.

०३. लोकसभा अध्यक्ष भारतातील कायदेमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात.

* लोकसभा अध्यक्षांचे स्वातंत्र्य व निःपक्षपातीपणा

०१. लोकसभा अध्यक्षाना पदावधीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांना लोकसभेच्या प्रभावी बहुमताने पारित झालेल्या ठरावाद्वारेच पदावरून दूर करता येते. हा ठराव मांडण्यासाठी १४ दिवसांची पूर्व नोटीस व त्यावर ५० सदस्यांच्या सह्या आवश्यक असतात.

०२. त्यांचे पगार व भत्ते संसदेमार्फत चालवले जातात. ते भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात. त्यांचे कार्य व वर्तणूक यावर लोकसभेत मौलिक प्रस्ताव वगळता चर्चा व टीका करता येत नाही.

०३. त्यांचे कार्यपद्धतीचे नियमन करण्याचे, कामकाज चालवण्याचे किंवा सभागृहात सुव्यवस्था राखण्याचे अधिकार देशातील कोणत्याही न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या अधिन नाही.

०४. त्यांना निःपक्ष बनविण्यासाठी मतदानाच्या पहिल्या फेरीत मतदान करण्याचा अधिकार नाही.

०५. अध्यक्ष लोकसभेचे संवैधानिक व औपचारिक प्रमुख व प्रमुख प्रवक्ता असतात. वरील तरतुदींच्या आधारे लोकसभा अध्यक्ष पदाचे स्वातंत्र्य व निःपक्षपातीपणा साध्य करण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती