'भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट' असे वर्णन केल्या जाणाऱ्या 'जीएसएलव्ही एमके-३

►  'भारताच्या भूमीतून भारतीयाला अवकाशात नेऊ शकणारे भारतीय रॉकेट' असे वर्णन केल्या जाणाऱ्या 'जीएसएलव्ही एमके-३' या रॉकेटच्या उड्डाणासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) सज्ज असल्याचे या संस्थेचे संचालक किरणकुमार यांनी आज सांगितले.

►  पुढील आठवड्यात आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरून हे प्रक्षेपण होणार आहे.

►  'जीएसएलव्ही एमके-३' हे भारताने आतापर्यंत तयार केलेले सर्वांत अवजड रॉकेट असून, सर्वांत अवजड उपग्रह अवकाशात वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे.

►  याद्वारे अवजड उपग्रह प्रक्षेपणाच्या अब्जावधी डॉलरच्या बाजारात प्रवेश करण्यास 'इस्रो' सिद्ध आहे, असे किरणकुमार यांनी सांगितले.

►  या रॉकेटची पुढील आठवड्यात होणारी चाचणी यशस्वी झाल्यास पुढील दशकभरात याच रॉकेटद्वारे भारतीय अवकाशवीर अवकाशात जाऊ शकेल, असा विश्‍वास किरणकुमार यांनी व्यक्त केला.

►  पृथ्वीच्या जवळच्या कक्षेत ८ टनांपर्यंतचा पेलोड वाहून नेण्याची 'जीएसएलव्ही एमके-३'ची क्षमता आहे.

►  भारतीय अवकाशवीराला अवकाशात नेण्यासाठी ही क्षमता पुरेशी आहे; मात्र यासाठी तीन ते चार अब्ज डॉलरचा निधी आवश्‍यक असून, केंद्र सरकारने मंजुरी दिल्यास दोन ते तीन जणांना अवकाशात पाठविण्याचा 'इस्रो'चा आराखडा तयार आहे.

►  या आराखड्यावर अंमलबजावणी झाल्यास मानवाला अवकाशात नेऊ शकणारा भारत हा रशिया, अमेरिका आणि चीननंतर केवळ चौथा देश असेल.

►  भारतातर्फे अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती एक महिला असू शकते, असे सूतोवाचही किरणकुमार यांनी केले.

►  'जीएसएलव्ही एमके-३' हे रॉकेट भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञांनी शून्यातून तयार केले असल्याने या 'हत्ती'ला पहिल्याच प्रयत्नात माणसाळण्याचा 'इस्रो'चा प्रयत्न असेल.

►  अर्थात, नव्या रॉकेटच्या पहिल्या उड्डाणात अनेकदा 'इस्रो'ला अपयश आले आहे. भारताचे 'पीएसएलव्ही' हे १९९३ च्या पहिल्या उड्डाणात अयशस्वी ठरले होते. त्यानंतर मात्र या रॉकेटने सलग ३८ यशस्वी उड्डाणे केली आहेत.

►  'जीएसएलव्ही एमके-१'चेही पहिले उड्डाण अयशस्वी झाले होते. ही परंपरा यंदा मोडली जाण्याची आशा आहे.

'जीएसएलव्ही एमके-३' ची वैशिष्ट्ये

►  ६४० टन : वजन (जंबो जेट विमानाच्या पाच पट)

►  ४ टन : वजन वर्गातील उपग्रह नेण्याची क्षमता

►  ४३ मीटर : उंची

►  ३०० कोटी : रॉकेटचा निर्मिती खर्च

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती