बल विषयी Force

1. बल
०१. न्यूटनच्या पहिल्या नियमावरून, अचल वस्तु गतिमान करण्यासाठी किंवा वस्तुची सरळ रेषेतील एक समान गती बदलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक राशीस बल असे म्हणतात.

०२. बलाद्वारे आपण

-----गतिमान वस्तुत वेगाच्या परिमानात बदल घडवून आणू शकतो.

----- वेगाचे परिमाण तसेच राखून केवळ गतीची दिशा बदलू शकता किंवा

----- वेगाचे परिणाम व दिशा या दोहोंमध्ये बदल करू शकतो.

०३. बल या राशीस परिणाम व दिशा असल्यामुळे बल ही सदिश राशी आहे.

०४. CGS पध्दतीत बलाच्या एककास डाईन (Dyne) असे म्हणतात. १ Cm/s2 वस्तुमानात १ त्वरण निर्माण करणाऱ्या बलास १ डाईन बल असे म्हणतात. १ न्युटन = १०-5 डाईन

2. बलाचे प्रकार

०१. पृथ्वी आपल्या पृष्ठभागावरील व सभोवतालच्या प्रत्येक वस्तुवर आकर्षण बल प्रयुक्त करते, या बलास पृथ्वीचे गुरुत्व बल (Gravitational Force) असे म्हणतात. पृथ्वीवरील सर्व वस्तुच्या गती गुरुत्व बलाने प्रभावित होतात. ग्रह, तारे, उपग्रह, कृत्रिम उपग्रह इत्यादी. सर्वांच्या गती गुरुत्वबलामुळे घडुन येतात.

०२. वस्तुमधील अणुंना व रेणुना एकत्रीत ठेवणारऱ्या बलास विद्युत चुबंकीय बल (Electromagnetic Force) असे म्हणतात. हे बल गुरुत्वबलापेक्षा कितीतरी पट मोठे असते. चुंबकाकडे लोखंडी टाचणी खेचली जाणे हे या बलाचे उदाहरण आहे.

०३. अणुच्या केंद्रकात असणाऱ्या वेगवेगळ्या कणांना एकत्र ठेवणाऱ्या बलास केंद्रकीय बल (Nuclear Force) म्हणतात. गुरुत्व बल व विद्युत चुंबकीय बल हे दोन्ही केंद्रकीय बल खुप मोठे असते.

०४. गुरुत्व बलाची सापेक्ष तीव्रता १ असते. विद्युत चुंबकीय बलाची सापेक्ष तीव्रता १०३८ असते. केंद्रकीय बल बलाची सापेक्ष तीव्रता १०४० असते. गुरुत्व बल हे सर्वात क्षीण असून केंद्रकीय बल हे सर्वात प्रबल असते. गुरुत्व बल व विद्युत बल ही दीर्घ आहे.

बले = बलांचा परिणाम

१. यांत्रिक बल = विहिरीतून रहाटाने पाणी काढणे

२. रेणू बल = पाण्याच्या थेंबातील बल

३. चुंबकीय बल = लोहकणांचे चुंबकाला चिटकणे

४. विद्युत बल = कागदाच्या कपटांचे, केसावर फिरविलेल्या कंगव्याकडे आकर्षण

५. गुरुत्वाकर्षण बल = झाडावरून खाली पडणारे फळ

६. घर्षण बल = क्रीडांगणावरून घरंगळत जाऊन चेंडूंचे थांबणे

​७. केंद्रकीय बल = अणुकेंद्र्कातील कणांना एकत्र ठेवणे

८. विद्युत चुंबकीय बल = अणु व रेणू यांना एकत्र ठेवणे

९. गुरुत्व बल = उपग्रहांची गती

3. न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम

F1=F2= G X ( m1Xm2)/ r*r

०१. एका पदार्थाने दुसऱ्या पदार्थावर प्रयुक्त केलेले गुरुत्व बल हे त्या पदार्थाच्या वस्तुमानांच्या गुणाकाराच्या समानुपाती व त्या पदार्था मधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपाती होत असतो.

०२. दोन पदार्थाचे वस्तुमान m1 व m2 पदार्थातील अंतर Dआकर्षण बल Fया ठिकाणी G हा स्थिरांक असून त्यास गुरुत्व स्थिरांक (Gravitinal constant) म्हणतात. या स्थिरांकाचे मुल्य 6.67 X 10 -11 Nm2/kg2 (न्यूटन मीटर वर्ग प्रती किलोग्रॅम वर्ग)

०३. गुरुत्वाकर्षणामुळे ध्रुव पृथ्वीभोवती फिरतो किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते.

4. पदार्थ व त्यांची घनता

पदार्थ = घनता (Kg/m3) = घनता (g/cm3)

१. इरीडीयम = २२४०० = २२.४

२. प्लाटीनम = २१५०० = २१.५

३. सोने = १९३०० = १९.३

४. पारा = १३६०० = १३.६

५. शिसे = ११३०० = ११.३

६. चांदी = १०५०० = १०.५

७. तांबे = ८९६० = ८.९

८. पितळ = ८५०० = ८.५

९. लोखंड / पोलाद = ७८०० = ७.८

१०. कथिल = ७३०० = ७.३

११.जस्त = ७१३० = ७.१

१२. ओतीव लोखंड = ७००० = ७.

१३. एल्यूमिनियम = २७०० = २.७

१४. संगमरवर = २७०० = २.७

१५. ग्रेनाईट = २६०० = २.६

१६. काच = २५०० = २.५

१७. चीनीमाती = २३०० = २.३

१८. सल्फ्युरिक एसिड = १८०० = १.८

१९. समुद्राचे पाणी = १०३० = १.०३

२०. मलई काढलेले दुध = १०३२ = १.०३२

२१. मलई न काढलेले दुध = १०२८ = १.०२८

२२. शुद्ध पाणी = १००० = १

२३. मशीनचे तेल = ९०० = ०.९

२४. मेण = ९०० = ०.९

२५. बर्फ = ९०० = ०.९

२६. अल्कोहोल = ८०० = ०.८

२७. पेट्रोल = ७१० = ०.७१

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्रातील काही प्रमुख डोंगर व टेकडया

महाराष्ट्रातील तलाव व सरोवरे

महाराष्ट्राची प्राकृतिक रचना व महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती